विद्यापीठाच्या प्रवेशपूर्व परीक्षा अर्ज नोंदणीचा आज शेवटचा दिवस   

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशपूर्व परीक्षेला अर्ज करण्यासाठी आज मंगळवार शेवटचा दिवस आहे. प्रवेश परीक्षा ३ ते ५ जून दरम्यान होणार असल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी करायची आहे, त्यांना आजच अर्ज करावा लागणार आहे. पदव्युत्तर (पीजी), एकात्मिक आणि आंतरविद्याशाखीय कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. यात पीजी प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० मे आहे. यानुसार मंगळवारी रात्री ११.५९ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. याबाबत उपनिबंधक सुनीता हजारे यांनी परिपत्रक काढले आहे.

Related Articles